-->

05 October 2011

माझ्या काही रोमांटिक चारोळ्या
************************************

तूच आहेस रे राजा
सख्या माझ्या ह्रदयाचा,
मनातही केव्हाच बहरलाय
वसंत तुझ्याच प्रितीचा.

- संतोषी साळस्कर.

************************************


नाजूक माझ्या ह्रदयाला
नेहमीच तू फुलासारखं जपतोस,
तुझ्या प्रेमाच्या सहवासात
कोमेजलेल्या मनालाही फुलवतोस.

- संतोषी साळस्कर.

************************************


माझ्या आयुष्यातील तुझं अस्तित्व
नाही ठरवू शकत दुसरं कुणीही,
कारण आपल्यामधील प्रेमाचं नातं
नाही पोकळ इतकंही.

- संतोषी साळस्कर.

*****************************

तुझ्या प्रेमाची ओंझळ
सदैव सोबत राहू दे, 
माझ्या सहवासाच्या प्रकाशात
कीर्ती तुझी सर्वदूर पसरू दे.

- संतोषी साळस्कर.

*****************************


स्वप्न की सत्य
खरे की खोटे?
प्रेमात पडल्यावर
फायदे की तोटे?

- संतोषी साळस्कर.

********************


प्रेमात नसते जबरदस्ती
हवा मनापासून स्विकार,
शेवटपर्यंत करणार असाल
तरच दया तुम्ही होकार.

- संतोषी साळस्कर.

********************


एकटक तुझं ते पाहणं
माझ्यातल्या मी ला हरविणं,
शिरून तुझ्या बाहुपाशात
माझं मग जगालाच विसरणं.

- संतोषी साळस्कर.

*********************


आतुर आपण दोघं
एकमेकांच्या सहवासाठी,
गर्दीतही फिरतो असे
जणूकाही अनोळखीच सर्वांसाठी.

- संतोषी साळस्कर.

********************


हातात हात अन
धुंद पावसाची रात,
एकाच छत्रीत दोघं
करूया प्रेमाची बरसात.

- संतोषी साळस्कर.

*********************

माझाच तू न तुझीच मी 
दिली या मनाने ग्वाही, 
म्हणूनच करतेय रे सख्या 
आज हे तन हि तुझ्या हवाली. 

- संतोषी साळस्कर. 

********************* 

माझ्या आसवांचे मोती 
तुझ्या ओठांनी हळुवार टिपले, 
त्याच क्षणी रे माझ्या राज्या 
तुला हृदयात कायमचे जपले. 

- संतोषी साळस्कर. 

*********************  

मिठीत तुझ्या स्वर्ग माझा
डोळ्यांत पाहता प्रेमाचा झरा,
सहवास हवासा वाटे क्षणोक्षणी
स्पर्श सर्वांगावर मोरपिसापरी
उधळून टाकावेसे वाटते रे सख्या
अश्यावेळी स्वत:स तुझ्यावरी.

- संतोषी साळस्कर.

2 comments:

 1. Hi
  I am Saurabh
  I see ur blog, Their in a very beautiful Words , I like ..

  Please continue ur blog

  ReplyDelete
 2. HI CAN I UPLOAD SOME IMAGES OF YOUR POEM ON MY PAGES, IF U DON'T MIND.

  ReplyDelete