-->

09 May 2020

माझ्या दोन पऱ्या !


माझ्या दोन पऱ्या !

एक माझी आई,
दुसरी माझी लेक,
एकीने दिला जन्म मजला
दुसरीमुळे पुर्नजन्म मिळाला ...

एकीच्या कुशीत मायेची उब,
दुसरीच्या मिठीत स्वर्ग सारा,
एक माझ्यात रमत असे
दुसरीत मी गुंतत गेले ...

एकीने शिकवले कसे असावे आचरण
दुसरीमुळे कळतेय कसे नसावे वर्तन,
एक जणू नवदुर्गाचे रुप अन्
दुसरी कडक लक्ष्मीचा अवतार ...

अवघे व्यापले विश्व माझे
दोघी माझा जिव की प्राण,
मातुत्व दिनी या आज
दोघींना माझा खास सलाम ...

- संतोषी