-->

05 October 2011

माझ्या काही विरह चारोळ्या

अखेरपर्यंत जळनेच बहुतेक
लिहिले आहे माझ्या नशिबात,
कोणासाठी कितीही काही केले तरी
दरवेळी उपेकक्षाच माझ्या पदरात.

- संतोषी साळस्कर.

*********************


तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणींच येवून
मला जास्त छळतात,
आसवांच्या दरीत बुडवून
नंतर विरहाच्या अग्नीत जाळतात.

- संतोषी साळस्कर.

***********************


आयुष्याचा वैताग आल्यावर
जगणंच नकोसं वाटतं,
मरणाची वाट पाहिल्यावर
ते ही पाठच दाखवून जातं.

- संतोषी साळस्कर.

***********************


जाणून आहेस सारेकाही
तरीही का हा दुरावा,
जिवघेणा वाटतो ग सखे
मला तुझा हा अबोला.

- संतोषी साळस्कर.

***********************


माझ्या मनातील भावना
कधी तुला कळल्याच नाही,
प्रितीच्या सुगंधी कळ्या कधी
तुझ्याही ह्रदयात उमलल्याच नाही.

- संतोषी साळस्कर.

********************


तु का असाच नेहमी
मला शब्दांत अडकवतोस,
मला तुझी खरी गरज असते
तेव्हा दुरच निघून जातोस.

- संतोषी साळस्कर.

********************


तुझ्या आठवनींचा आता
मला आलाय कंटाळा,
डोळ्यांतील अश्रुं ही जणू
लागलेत हळुहळु गोठायला.

- संतोषी साळस्कर.

********************


तुझ्यावर विश्वास ठेवून
मी पुन्हा नाही फसणार,
डोळे उघडे ठेवूनच आता
प्रत्येक पावुल उचलनार.

- संतोषी साळस्कर.

***********************


आकर्षणालाच आपण
प्रेमाचं नाव देतो,
असंख्य चुका मग
क्षणाक्षणाला त्यात करतो.

- संतोषी साळस्कर.

************************


डोळ्यांत जेव्हा माझ्या
आसवांचा पाऊस दाटतो,
एकांतच तेव्हा मला
खूप आपलासा वाटतो.

- संतोषी साळस्कर.

***********************


कुणी न माझा
न मी कुणाची,
माझा एकटेपणाच
माझा सखा सोबती.

- संतोषी साळस्कर.

********************


स्वप्न तुटायला वेळ लागत नाही,
हृदय फुटायलाहि वेळ लागत नाही,
वेळ लागतो तो फक्त
आठवणी कायमच्या पुसून टाकायला...

- संतोषी साळस्कर.

********************


अश्रूंची नदी
लागली वाहायला,
हृदयातीलच आगीला
जणूकाही विझवायला.

- संतोषी साळस्कर.

********************


हाती विरहाचे काटे उरले
वाटुनी प्रेमाची फुले,
जीवन माझे तप्त वाळवंट
मृगजळच जिथे तिथे.

- संतोषी साळस्कर.

************************


मनातले तुझ्या मलाही कळूदेत,
डोळ्यांतील अंश्रू मलाही दिसूदेत,
नव्हतेच जर आपल्यात काही तर
स्वपनांच्या महालात का अडकवलेस?
दोष देवून आपल्या नशिबाला,
माझ्या भावनांना का असे फ़सवलेस?

- संतोषी साळस्कर.

************************

तालाब जाके मिला नदी को 
नदी जाके मिली सागर को, 
हम ने दिल दिया आपको 
और अपने दिया किसी और को... 

- संतोषी साळस्कर.

*******************************************

**********************************
********************************************************************************


***************************************

No comments:

Post a Comment