-->

05 February 2022

एकटी


सोबत असुनही कुणी का वाटे 
मज मी एकटीच या जगात,
चालतेय काट्यांची वाट 
अनवाणी घेवून डोक्यावर भार ...

सावरू तरी कशी स्वःताला
अवेहलनाच मिळतेय क्षणाक्षणाला,
अबोल राहून नूसतेच पाहणे
आवरावे तरी कसे या बधिर मनाला ...

दारुचे घोट रिचवत मस्त बेफिकीरीत
आयुष्य स्वःताचे तो जगतोय,
मला मात्र जुंपलेय बैलागत 
संसाराच्या रहाटगाड्याला ...

गाढवापरी दिवस रात्र सतत
कामच करत रहायचे,
याने मित्रांसोबत मस्त 
गप्पा मारत फिरायचे ...

चूल, मूल, नोकरी, व्यवसाय
होतेय तारेवरची कसरत,
लग्न करून का वाटतेय
झाल्यासारखी फसगत ...

देवा हे असेच अजून 
किती दिवस चालवायचे ?
सर्व काही निमूट अजून
किती दिवस सहायचे ?

- संतोषी साळस्कर.

No comments:

Post a Comment