-->

17 March 2021

लग्न म्हणजे?

लग्न म्हणजे ...

दोन जिवांचे मिलन
की पिंजऱ्यातील बंदिस्त जीवन?

एकमेकांना स्पर्शण्याची हुरहुर
की जबाबदारींच्या ओझ्याची कुरबुर?

एकमेकांवर ठेवलेला विश्वास
की नात्यांमध्ये कोडलेला श्वास?

येणाऱ्या सुखाची चाहुल 
की आगीतून फुफाट्यात टाकलेले पाऊल?

- संतोषी