-->

11 June 2015

गुलमोहर

गुलमोहर

माझीच वाट पाहत
जणू उभा असतोस …
येण्याआधीच वाटेत
गालीचा अंथरतोस…

दिसताच माझ्यावर
फुले का उधळतोस …
नकळत माझं लक्ष
दरवेळी वेधतोस …

पाहताच तुला माझे
वेडे मन सुखावते …
क्षणभर मी हि तुझ्या
छायेत रे विसावते …

डेरेदार वृक्ष तुझा
रस्त्याला पूर्ण व्यापतो …
तापलेल्या अंगाला तू
ग्रीष्मात थंडावा देतो ...

केशरी रंग हा तुझा
मनाला खूप भावतो …
अरे गुलमोहर … तू  ...
मला प्रियकरच वाटतोस …

- संतोषी साळस्कर.

4 comments: