-->

23 February 2012

माझ्या काही गंभीर कविता


कोण मी?

कोण मी? ... मी एक वांझोटी ...
दोष माझा काहीही नसतानाही मुल होत नाही म्हणून
नवरयासहित सर्वानी अपशकुनी ठरवली,
इतरजणी जेव्हा त्यांच्या मुलांना माझ्यापासून दुर करतात
खरंच मनावर खुप असंख्य जखमा होतात ...

कोण मी? ... मी एक अविवाहित गर्भवती ...
सर्वकाही करून तो नामनिराळा राहिला
कुलटा कलंकिनीचा कलंक मात्र माझ्या एकटीवरच आला,
प्रश्नार्थक नजरा सर्वांच्या झेलतेय
कारण माझ्या होणाऱ्या बाळाला मी वाढवतेय ...

कोण मी? ... मी एक बलात्कारीत ...
स्वत:च्या वासनेची भूक भागवण्यासाठी
एका नराधमाने जबरदस्ती मनाविरुद्ध कुस्करली,
शरीरावरच्या जखमा एकवेळ भरतीलही पण
मनावरच्या जखमांचं निवारण मी कसं करू ...

देव पण तो कसा पक्षपाती
पुरुषाला वेगळा न्याय, स्त्रिया नेहमीच उपेक्षित
लाज, शरम फक्त आम्हा स्त्रियांसाठीच अन्
वाईट कृत्य करून पुरुषांनी मात्र फिरावं उजळमाथी
का अखेर एक प्रश्नच बनून राहिलो आम्ही स्वत:साठी? ...

- संतोषी साळस्कर.

3 comments:

 1. सनई चौघडे चित्रपटातली एक ओळ आवर्जून सांगावीशी वाटते, तुम्हालाही पटेल

  सर्व पुरुष हे सारखेच असतात,
  पण एकसारखे नसतात.

  बाकी कविता खूपच छान

  ReplyDelete
 2. जळजळीत , प्रखर काव्य....

  ReplyDelete