-->

23 February 2012

माझ्या काही रोमांटिक कविता


प्रेमाचे वारे

क्षण ते मोहरलेले
धुंद सुगंधित सारे
शहारे आणती सर्वांगावर
स्पर्श तुझे ते का रे ...
हरवून जाई माझ्यातून मी
होता नटखट इशारे
होई तुझ्यातच एकरूप
विसरून देहभान सारे ...
तेव्हा  माझी मी राही
अन् तू तुझा सख्या रे
बघ ना काय, कसे हे होई
जेव्हा वाहती प्रेमाचे वारे ...

- संतोषी साळस्कर. 


************************************

तुम

गुरुर भी तुम
सुकून भी तुम
इस दिल का अब
जुनून भी तुम
जख्म जो है दिल पे
उसकी दवा भी तुम
जिने की अब वजह भी तुम
हर जगह बस तुम हि तुम!

- संतोषी साळस्कर.

************************************


प्रेमवेडी

दिवसाचा तळपता सुर्य
रात्रीचा शितल चंद्र
दोघं मला हसतात,
तुझ्या विचारात मी वेडी
येता जाता सर्वाना सांगतात.

अल्लड बेभान वारा
खटयाळ पाऊसधारा
माझी खोडी काढतात,
तू जवळच असल्याची
सैदव जाणिव करून देतात.

उफाळणारा सागर
शांत समुद्रकिनारा
मदहोश मला करतात,
तुझ्या आठवणीत अगदी
चिंब चिंब भिजवून टाकतात.

- संतोषी साळस्कर. 


************************************


सख्या रे, आज व्हॅलेंटाइन्स डे!

तुझ्या दृष्टीने तसा रोजचाच सर्वसामान्य दिवस...
पण माझ्यासाठी, वेळ काढून साजरा केलेला एक सोनेरी क्षण.

मला हा संपूर्ण दिवस तुझ्या सोबत घालवायचाय...
समुद्र किनारी बसून तुझ्या हातात हात द्यायचाय.

वाळूत आपले एक छोटेसे सुंदर घरटे बनवून ...
शंख शिंपल्यांनी आपला तो महाल सजवायचाय.

मग बर्फाचा गोळा एकमेकांकडे पाहत खाऊ ...
शहाळ्यातले पाणी हि एकाच स्ट्रा ने पिऊ.

चल ना रे सख्या
रोजच्यापेक्षा आज काही तरी वेगळे करू ...
एकमेकांच्या सहवासात मावळता सूर्य पाहु.

चांदण्या रात्रीत मग चंद्राकडे एकटक पाहत राहू.
साक्षी ठेवून त्याला कुशीत एकमेकांच्या विसावू ...

सख्या रे! आज तरी  तुझा व्यवहारीपणा सोड ना ...
थोडासा रोमांटिक होऊन माझ्यासारखाच विचार कर ना.

- संतोषी साळस्कर.***************************************


क्या यही प्यार है?

तुमको देखा तो
ये खयाल आया,
भगवान ने तुम्हे जैसे
मेरे लिये हि बनाया!

क्यो करती हू न जाने,
तुम्हारा हि इंतजार
क्यो रहती हू न जाने
हरपल मे बेकरार!

क्यो दिल है खोया
तुम्हारे हि प्यार मे,
क्यो आंखें है नम
तुम्हारी हि याद मे!

न जाने ये क्या है
जो मुझे हुआ है,
क्यो ऐसी हालत है
क्या याही प्यार है!

- संतोषी साळस्कर

1 comment:

  1. क्षण ते मोहरलेले
    धुंद सुगंधित सारे....

    very nice....

    ReplyDelete