-->

13 July 2013

विरह कविता

एकतर्फी प्रेम

स्वत:लाच फसवते मी
नव-नवीन स्वप्ने पाहून,
प्रेम हि का मिळवावे लागते
आजकाल भिक मागून ...

रममाण तो स्वत:च्याच विश्वात
परवा न त्यास कसलीही,
मीच का मग वेडीपिशी
त्याच्यासाठी अशी झालेली …

विचार करून अखेर
काहीच उपयोग नव्हता,
तो वर बसलेला भगवंत
सगळी सूत्रे हलवत होता …

एकतर्फी प्रेम केलं
हा का झाला माझा गुन्हा,
देवा नको ना आणूस अश्या
व्यक्तींना आयुष्यात पुन्हा …

- संतोषी

5 comments:

  1. -Mi tumchya saglya poems and charolya read kelya.. kharrch khup chhan collection ahe tumchya kade..layi Bhaariiiii...........

    ReplyDelete
  2. Sorry Not A good writer but ...

    Prem he aste jari kahi kadhi na pahta.
    naste kadhihi bhavnana na pahta.
    prem jyanche aaplyavari prem tya nahmich dya. je na pahti fironi pahave na kashich tya.

    ReplyDelete