-->

23 February 2012

माझ्या काही विरह कविता


एकली

तन-मन-धन सारंकाही
वहिलं ज्याच्या चरणी,
अचानकच निघून गेला तो
मला सांगताच काही.

परकं धन म्हणून आई-बाबांना
झाली होती लग्नाची घाई,
पण मला खरंच आता
कुठल्याच मुलात इंटरेस्ट नाही.

माझा लढा सुरु होता
माझ्याच मनातील विचारांशी,
क्षणोक्षणी विचारल्या गेलेल्या
सगळयांच्या हजार प्रश्नांशी.

का, कुठे, कशाला खरंच
वैताग आणलाय या शब्दांनी,

म्हणूनच घेतलाय एक निर्णय
मी करून निश्चय मनाशी.

अखेर तोडूनी सारे पाश
आज मुक्त मी झाली,
सगळी नाती ती माझी
दुरवरच सोडून आली.

आता कुणाची मुलगी
ना कुणाची मी बहिण,
नाही कुणाची प्रेयसी
अन् ना कुणाची मैत्रीण.

इथे कुणी मजला
कसलेही प्रश्न पुसती,
कुणा उत्तरे हि
कसली दयावी लागती.

माझी मी एकलीच इथे
मागे ठेवले सर्व काही,
आठवणींचं गाठोडं तेवढं
पाठलाग काही सोडत नाही.

- संतोषी साळस्कर. 


************************************

एकतर्फा प्यार

न जाने दिल ने वो क्यो सुना
जो तुमने कभी भी ना कहा,
अब तो कोई बात भी नही रही
जब तुमने अपनी अलग हि राह चुनी!

फिर भी न जाने दिल को
अभी भी है कोई तो आस,
तुम्हारी यादे तो तुम्हे
और भी ले आती है मेरे पास!

क्यो होती है ऐसी हालत
जब होता है एकतर्फा प्यार,
है पता नही तुम लौट के आनेवाले
फिर भी दिल करता है इंतजार!

आ भी गये जो लौटकर तुम
शायद तब तक ना रहे हम,
रोओगे हमारी याद मे तुम पर
जलकर खाक हुये होंगे हम!

- संतोषी साळस्कर

***************************************

प्रेम अन् मैत्री

तुला काय वाटलं
सगळं तुझ्या मर्जीप्रमाणेच घडणार?
तुला वाटेल तेव्हा प्रेम
नाहीतर फक्त मैत्री असणार?

तुला हवा तसाच निर्णय
दरवेळी का तू घेणार?
कधी रे तू सांग ना
थोडीतरी माझी कदर करणार?

तुझे दिवस गेले रे
मीही माझ्या मनाप्रमाणेच वागणार,
यापुढे तुला माझ्या आयुष्याचा
खेळ नाही करू देणार.

याआधी सर्वकाही तूच ठरवलेस
आता मीच सगळे ठरवणार,
प्रेमातून फक्त मैत्री अन् पुन्हा प्रेम
करायला यापुढे मला अजिबात नाही जमणार.

- संतोषी साळस्कर. 

************************************

आस

स्वप्नातल्या राजकुमाराची
कुमारिकेला आस...

माहेरच्या घराची
विवाहितेला आस...

पोटातल्या बाळाची
गर्भवतीला आस...

तशीच माझिया मनाला
तुझ्या भेटीची आस...

दाही दिशा नजरेला
तुझ्या परतीची आस...

अचानक तुझ्या जाण्याने
जीव नकोसा होतोय...

ये ना रे सख्या लवकर
विरह जीवघेणा वाटतोय...

- संतोषी साळस्कर.


No comments:

Post a Comment