अव्यक्त
बोलून काही उपयोगच नसेल तर
सारेकाही मूकपणे पहायचे,
मनातले मनातच ठेवायचे,
भावनांना कधीच व्यक्त नाही करायचे....
सतत अपयशच येत असेल तर
नशिबात असेल ते भोगायचे,
आलेले प्रत्येक दु:ख सहायचे,
सुखाच्या अपेक्षेत उगीचच नाही झुरायचे....
मनाला जास्तच त्रास होत असेल तर
अश्रूंना मोकळे होवू द्यायचे,
स्वत:ला कामात वाहून घ्यायचे,
व्यर्थ स्वप्नात अजिबात नाही रमायचे...
- संतोषी साळस्कर.
************************************
अश्रू
अजून किती वेळ रे तुम्ही
असेच वाहत राहणार,
हृदयावरच्या जखमा
उगीच कुरवाळत बसणार...
बसा ना रे गप्प
नाही तर कुणी बघेल,
बिंग माझ्या रडण्याचं
जगासमोर नाहीतर फुटेल...
तुम्ही तरी रे निदान
दया ना माझी साथ,
रडव्या चेह्र्यासह सांगा ना
कशी वावरू मी सर्वांत...
khupach apratim. Manachya taral savvedana jagavnarya kavita ahet !!!!
ReplyDelete