-->

31 May 2011

अशी मी, तशी मी


अशी मी, तशी मी

मी आहे अशी, मी आहे तशी
मलाच कळत नाही नक्की मी कशी,
कुणी म्हणतं खूपच साधी, गबाळी,
कुणी म्हणतं भांडखोर भारी.

पण खरं सांगू का...

मी आहे राजकुमारी,
माझ्या स्वप्नातल्या जगाची,
जिथे चालते हुकुमशाही
नेहमीच माझ्या मनाची.

मला आवडतं फुलं-पानांत रमायला,
निसर्गस्थळी वाटेल तेव्हा फिरायला.
छंद माझे चित्रातील रंगाशी खेळणे,
मनातील विचार कवितेतून मांडणे.

नवनवीन शिकण्याची आवड
नृत्य हि मला खूप भावतं,
आवडीचे संगीत हि मग
नकळत ठेका धरायला लावतं.

रातकिडयासारखे रात्रभर जागते
आणि सकाळी उशिरा उठते,
स्वत:च्याच अशा एका वेगळ्या
विश्वात नेहमीच रमते.

मनात जे येतं तेच बोलते
न बाळगता कसली भीड,
खोटं बोलणारयांची मात्र
मला खरंच येते खूप चीड.

अजून काय बरं सांगू?
मी स्वत:बद्दल आता
चांगली कि वाईट ते
तुमचं तुम्हीच ठरवा.

- संतोषी साळस्कर.

23 comments:

 1. इतका सुंदर आणि त्याहून अगदी खरा bio-data खूपच भावला.
  सगळ्यांना नाही जमत असं.
  sketch सुद्धा अप्रतिम. मस्त .

  ReplyDelete
 2. खूपच छान आहे हो मला अगदी आवडली ०९५३३ ४९ ५१३६

  ReplyDelete
 3. sunder...mastach ekdum...agadi ashach aahat tumhi madam...

  ReplyDelete
 4. Rat sabhoti vardalanari
  gard zadichya pana adun
  tuzya pritila ale baharun
  Phul kowale dat vanatun

  ReplyDelete
 5. अस्सल कोल्हापुरी म्हणाल तर नाद खुळा

  किरण सावंत शिरोली पुलाची, कोल्हापूर

  ReplyDelete
 6. खूपच छान आहे हो मला अगदी आवडली

  ReplyDelete
 7. khupch chan aahe kharch konal konacha bhavnanchi kashi kadar nastr na kas koni kunala dukhavo shak na yar its so difficult 4 me yar

  ReplyDelete
 8. khupach chan
  तिचे मनो वी श्व तर मला खूपच आवडलं
  तुझा email id दे

  ReplyDelete
 9. hey hiiii santoshi tujya poem tar kharach khup dhinkchak ahet yaar..nice...kep going on...

  ReplyDelete
 10. mast kavita sarvach mast pan he matra khara tuza sarkhi tuch !!!

  ReplyDelete
 11. Santoshi khupach sundar kavita aahet tuzya. "Tiche manovishwa" hi kavita khup avadali mala.

  Shivay tuzya paintings aani skeches hi.

  Apratim.

  Khup Khup Shubheccha tuzya bhavi kavintansathi aani tya rachnasathi.

  ReplyDelete
 12. wow khupach chan. kharach madam tumacha blog khupach chan ahe.

  ReplyDelete
 13. write something about astrological sign :- LIBRA

  ReplyDelete
 14. masssst___ sketches, kavita ani photos. khup divsani me swathal jascha tase pahela......

  ReplyDelete
 15. chhan aahe ha
  agadi manapasun avadale
  santosh bhalekar
  bhalekar9@gmail.com

  ReplyDelete
 16. u r very sweet khupach sundar aahet aaplya kavita mala aaplya sarv kavita aavdatat thank u so much

  ReplyDelete
 17. http://www.marathimanch.com/index.php

  ReplyDelete
 18. PLIZ PUBLISH UR POEM AND LITERATURE.IF U R ALRREADY PUBLISHED PLIZ SEND ITS AVIALIBILITY

  ReplyDelete
 19. very nice.r u published ur poem

  ReplyDelete
 20. greatttttttttttttttttt......... kay imotions aahet yarrrrrrrrrrrrrrrr....

  ReplyDelete
 21. अशी मी , तशी मी छान कविता ,
  आमचं आम्हीच ठरवायचं आहे ना
  नक्की मी कशी मग ..
  आहेस तशीच छान छान बरी .

  खूपंच छान कविता

  सुरेन्द्र देशपांडे

  ReplyDelete