-->

05 May 2007

माझ्या काही इतर कविता

मन आणि हृदय

मनाचं बंड सुरु झालंय हृदयाशी,
अचानक पटेनासं झालंय दोघांच एकमेकांशी.

मनाने घेतला पवित्रा बोलू लागला हृदयाशी,
नेहमीच तू स्वत:च्या मर्जी प्रमाणे वागतोस,
चार चौघात मग माझी लाजच घालवतोस.

असं रे तू कसं काय म्हणतोस?
श्वास जरी माझे असले तरी सगळे आदेश तूच देतोस,
आणि मी मर्जी प्रमाणे वागतो म्हणून मलाच वर दोष देतोस.

किती वेळ तुला सांगितलं Always be Practical in life,
Don’t get Emotional Fool, तरी पुन्हा त्याच चुका करतोस,
नको त्या आठवणींना सांग ना का कवटाळून बसतोस.

मी तरी काय करू रे हवं ते मिळत नाही
आणि उपेक्षा पाठलाग सोडत नाही,
आठवणीच काय त्या मला साथ देतात.

नको करूस यापुढे कोणावरही आंधळ्यासारखा विश्वास,
तुझ्या अश्या वागण्याचा त्रास आम्हांला रे होतो,
दरवेळी तुझ्या रडण्याने जीव आमचा तीळ तीळ तुटतो.

खरं सांगायचं तर माझा ही नाईलाज असतो,
आशेच्या हिंदोळ्यावर मी नेहमीच झुलत असतो,
परतून येणार नाही प्रीती तरी वाट पाहत राहतो.

अरे जे मिळणार नाही त्यामागे का तू असा धावतोस,
समजून ही सारे काही मुर्खासारखाच वागतोस,
स्वत:सकट मग आमचा ही छळवाद मांडतोयस.

काय रे तुम्ही दोघं असे कशाला भांडताय?
योग्य मार्ग दाखविण्याऐवजी मला अजूनच confuse करताय.

मनाच्या जागी मन आणि हृदयाच्या जागी हृदय योग्य!
पण तुम्हीच मला सांगा अश्यावेळी मी काय करायचं?
मन आणि हृदय यापैकी नक्की कोणाचं ऐकायचं?


- संतोषी साळस्कर.

************************************************

पाऊस ओला चिंब!

पाऊस म्हणजे हिरवळ
कुठे सुगंधी मातीचा दरवळ.

पाऊस म्हणजे निसर्गाची उधळण
डोंगर माथ्यावर धुक्यांची पखरण.

पाऊस म्हणजे वाहता निर्मळ झरा
सोबत कानात गुज घालणारा वारा.

पाऊस म्हणजे सखा आयुष्यभराचा
उन्हात मिसळून बनलेला रंग इंद्रधनुष्याचा.

- संतोषी साळस्कर.


*****************************************


नियम

माझ्या मना आता तरी सुधर
जुन्या आठवणींना तू कायमचं विसर.

अश्रुंनी यापुढे कधीच नाही वाहायचं
डोळ्यांच्या आताच बंदिस्त व्हायचं.

हृदयाने नाही उगीच कोणावरही भाळायचं
प्रेमापेक्षा मैत्रीलाच जास्त महत्वाचं मानायचं.

पापण्यांनी सतत नाही मिटायचं
भेदक नजर ठेवूनच समोरच्याला भिडायचं.

आजपासून तुमच्यासाठी हे नियम आहेत खास,
नाही ऐकलात तर बघा माझ्याशी आहे गाठ!

- संतोषी साळस्कर.

*******************************

कविता

कधी कधी मनाला
सहजच काहीतरी सुचतं,
विचार करता करता ते
कविताच करत बसतं.

मनातील भावना जणू
कवितेत माझ्या उतरतात,
इतरांजवळ हळूच त्या
गुपित माझं उलगडतात.

मनावरचं ओझं थोडं
कमी झाल्यासारखं वाटतं,
ऐकणारं जेव्हा कुणीतरी
कवितेरूपी माझ्याजवळ असतं.

- संतोषी साळस्कर.


******************************


हॉस्पिटल

औषधांची विपूल रेलचेल
नातलगांची नकोशी ये-जा,
असहाय्य पेशंट खेळणं
सराईत डॉक्टरच्या हातचा.

General, ICU, Special
Ward तरी किती,
बघुन एकेक Equipment
वाटायला लागते भिती.

असो कुठलीही अवस्था
बालपण, तारुण्य वा म्हातारपण,
आपल्याला करते फक्त निराश
येते जेव्हा कधी हे आजारपण.

काही सात्वंन करतात
तर काही घाबरवून सोडतात,
स्वत:च्या अनुभवांची मग
कथाच सांगत सुटतात.

बघून बिलाची रक्कम
जो तो पडतो चाट,
सरकारी असो वा खाजगी
पेशंटची लागते पुरती वाट.

- संतोषी साळस्कर.


***********************************


झोप

एका नविनच विश्वात
आपल्याला नेवून सोडते,
अशी ही झोप सगळेच
टेन्शंन विसरायला लावते.

वेळेवर आली तर चांगली
नाहीतर पंचाईत करुन सोडते,
या कुशीवरुन त्या कुशीवर
नुसतेच लोळत पडायला लावते.

कुणी म्हणत जास्त झोपणारा
असतो मुलखाचा आळशी,
सुखाने झोपू द्या हो मला
तुम्हांला कशाला त्याची काळजी.

कविता करता करताच
बघा पुन्हां जांभई आली,
कारण एक झोप काढायची
माझी पुन्हां वेळ जी झाली.

- संतोषी साळस्कर.


******************************************

विचार

कधी चांगले कधी वाईट
विचार डोक्यात येतात,
हृदयाला मग हवं तसं
आपल्या मनाप्रमाणे वागवतात.

कधी वर्तमानाची चिंता
कधी भविष्याची भीती,
कधी नुसत्याच आठवणी
साले विचार तरी किती.

विचारांच्या गतीला ह्या
विश्रांती कधी मिळणार,
आयुष्याला पूर्णविराम लागल्यावरच
बहुतेक हे हि यायचे थांबणार.

- संतोषी साळस्कर.


****************************************


थांबला तो संपला

आयुष्याच्या वळणांवर दरवेळी
काहीतरी नविन घडत असतं,
चांगलं काहीतरी त्यातूनही
आपणंच शोधायचं असतं.

नशिबाला दोष देणारे लोक
नेहमीच हरत राहतात,
प्रयत्न केला मनापासून तर
स्वप्नेंही जरुर साकार होतात.

ईच्छाशक्तीच्या बळावर
माणूस सदैव जिंकतो,
थांबला तो संपला आपण
म्हणूनच तर म्हणतो.

- संतोषी साळस्कर.


******************************


आयुष्याचा जमाखर्च

काय मिळवलं आणि काय गमावलं
आयुष्याच्या जमाखर्चात काय कमावलं.

प्रत्येक गोष्ट जरी मिळाली हाती
मनाला नाही तरीही थोडीही शांती.

जेवणात नुसतेच वेगवेगळे पंचपक्वान
तृप्तीचे नाही त्यात कसलेच समाधान.

ओठांवर नुसतेच देवाचे नाव
पण मनात नाही कसलाच भाव.

प्रेमाचा सहवास हवाय प्रत्येकवेळी
पण नात्यांच्या बंधनात अडकायचे नाही.

मांडला हिशोब जेव्हा जमाखर्चाचा
बाकी शिल्लक होता फक्त गोल शुन्याचा.

- संतोषी साळस्कर

********************************************



मला काय व्हावेसे वाटते?

कधी कधी मला असे वाटते,
फ़ुलपाखरांप्रमाने हवेत तरंगावे,
या फ़ुलावर तर कधी त्या फ़ुलावर,
बसुन गोड गोड मध प्यावे.

कधी कधी मला असे वाटते,
माश्याप्रमाने पाण्यात पोहावे,
या खडकात तर कधी त्या,
खड्कांत शिरुन मस्त डूबावे.

कधी कधी मला असे वाटते,
पक्ष्यांप्रमाने आकाशात उंच उडावे,
आज या देशात तर उद्या,
त्या देशात वाटेल तेव्हा फ़िरावे.

पशुपक्ष्यांचे असे हे जीवन,
किती आंनदी असावे,
परंतू पैशांसाठी जगणार्र्या आंम्हा,
मानवास ते कधी ही न कळावे.

- संतोषी साळस्कर.




 

 


*********************************************



***********************************************


                                             ****************************************

8 comments:

  1. हे संतोषी
    तुझा ब्लॉग मस्तच आहे अश्याच सुंदर सुंदर कवीता पाठवत जा.

    ReplyDelete
  2. hi santoshi tuzhi hi kavita agadhi maazay manachay kavall aahe.......... very nice

    ReplyDelete
  3. kay sundar aahet dear tujhya kavita............kharach khup khup sundar............

    ReplyDelete
  4. khupach chaan !!!

    hya site var khup Marathi Kavita, Marathi Jokes, Marathi Charolya, Lekh scraps, Stories, Greetings, Sahitya etc aahet

    Visit: http://mannmajhe.blogspot.com/

    ReplyDelete
  5. Hiii,,, santoshi khup divsanantar chan kahi shiknyas milale.

    THANK U

    ReplyDelete
  6. tumchya kavita apritam aahe..

    ReplyDelete
  7. काव्य छान आहे....विचारांना रोखण्याचा प्रयत्न करु नका....मुक्त होऊ द्या विशाल मनाच्या सर्व शाखांना..काव्य फ़ोफ़ावेल नक्कीच..

    ReplyDelete