-->

तिचे मनोविश्व

आजकाल ती जरा विचित्रच वागत होती. सर्वांपासून अलिप्त रहायची. कोणाशी जास्त काही बोलायची हि नाही. ती सोडून तिच्या आजूबाजूच्या सगळ्यांना म्हणजेच तिचे ममी, पपा, तिचे मित्र-मैत्रिणीं यांना तिच्या वागणूकीतला हा फरक जाणवत होता, पण तिला नक्की काय झालंय हे कोणालाच काही कळत नव्हतं.

पण ती... तिच्या मते तिचे आता सुरवंटातून फुलपाखरात रुपांतर झाले होते. कारण हि तसेच होते. कालच तिचे त्याच्याबरोबर लग्न झाले होते आणि रात्री तिला भरपूर सुख देवून सकाळी तो नेहमीप्रमाणे कुठेतरी गायब झाला होता. पण तिला ह्यावेळी त्याच्या निघून जाण्याचे काहीच वाटत नव्हते. कारण रात्री परत भेटण्याचे वचन देवूनच तो निघून गेला होता आणि तिला हवे त्यावेळी तर तो तिच्या जवळच असायचा. डोळे बंद केल्यावर तिला त्याचं अस्तित्व जाणवत रहायचं .......... (Continued)
लेडीज गप्पा-टप्पा

राणी : वाह! सगळ्याजणी आल्या पण.
शैला : या लेट लतीफ... तुझी हि नेहमी उशिरा यायची सवय कधी जाणार गं?
राणी : माहित नाही....
अलका : कशी आहेस राणी?
राणी : कशी दिसतेय?
अलका : तुझ्यात अजून काही फरक पडलेलाच नाही. कॉलेजमध्ये जशी होतीस अजून हि तशीच आहेस.
राणी : म्हणजे? चांगली कि वाईट?

शैला : तुला वाईट म्हणायची हिंमत कोणात आहे एवढी! हाहाहाहा....

राणी : वॉट अ जोक... किती बरं वाटतंय ना... किती दिवसानंतर आज आपण सगळ्याजणी एकत्र भेटतोय .......... (Continued)

 


चार भिंती घराच्या!

(सकाळची वेळ ...)

आई : राणी उठायचं नाही का गं? अग सकाळचे दहा वाजले, उठ गं आतातरी. शेजारच्या इतर मुली बघ, उठून घरातल्या कामालाही लागल्या असतील आतापर्यंत. आणि तू अजून झोपूनच आहेस.

राणी : काय आहे गं? रविवारचा एकच दिवस तर मिळतो आरामात झोपायला, तेव्हाही तुझी कटकट चालूच असते.

आई : आमच्याकडे म्हणून चालून जातात तुझे हे नखरे. उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर कसं होणार तुझं देवालाच माहित!

राणी : काय वैताग आहे. सुखाने झोपू पण देत नाही एक दिवस कुणी.

आई : आजही कुठे जाणार आहेस की निदान आजतरी घरी आहेस? .......... (Continued)